रमी कार्ड गेम कसा खेळायचा: रमीच्या नियमांसह सुरूवात करा
रमी हा एक पत्त्यांचा खेळ असून तो पत्त्यांच्या दोन गठ्ठ्यांसह आणि एकूण दोन जोकर्ससह खेळला जातो. रमीचा गेम जिंकण्यासाठी खेळाडूने पत्त्यांच्या दिलेल्या दोन गठ्ठ्यांमधून पत्ते उचलून आणि नको असलेले पत्ते टाकून योग्य पद्धतीने पत्ते लावून पत्त्यांचा डाव लागल्याची घोषणा करायची असते. एक गठ्ठा झाकलेला असतो, ज्यातील पत्ते उचलताना खेळाडूला दिसत नाहीत, तर दुसरा गठ्ठा खेळाडूंनी त्यांना नको असलेल्या आणि टाकलेल्या पत्त्यांचा असतो, जो खुला असतो. रमी ह्या पत्त्यांच्या गेममध्ये जिंकण्यासाठी खेळाडूंनी त्यांचे पत्ते वैध सीक्वेन्सेस आणि सेट्समध्ये लावणे गरजेचे असते.
रमीमध्ये प्रत्येक सूटमधील पत्ते कमी मूल्यापासून जास्त मूल्यापर्यंत असतात. त्यात एक्का, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९, १०, गुलाम, राणी आणि राजा यांचा समावेश असतो. यापैकी एक्का, गुलाम, राणी आणि राजा यांना १० गुण असतात, तर उर्वरित पत्त्यांना त्यांच्यावरील आकड्यांनुसार गुण असतात. उदा. ५ आकडा असलेल्या पत्त्यांना ५ गुण असतील आणि तसेच इतर पत्त्यांच्या बाबतीत.
रमीचे उद्दिष्ट्य
रमी ह्या पत्त्यांच्या खेळाचे उद्दिष्ट्य १३ पत्त्यांना वैध सेट्स आणि सीक्वेन्सेसमध्ये लावणे हे आहे. डाव जिंकण्यासाठी तुम्हांला कमीत कमी २ सीक्वेन्सेस बनवणे अनिवार्य आहे, ज्यापैकी १ प्युअर (शुद्ध) सीक्वेन्स आणि बाकी वैध सीक्वेन्स किंवा सेट्स असले तर चालतील. प्युअर सीक्वेन्सशिवाय तुम्ही रमीचा डाव लागल्याची वैध घोषणा करू शकत नाही. हा रमीच्या सर्वांत महत्त्वाच्या नियमांपैकी एक आहे.
सीक्वेन्स कसा बनवायचा?
रमीमध्ये सीक्वेन्स म्हणजे एकाच सूटमधील तीन किंवा अधिक सलग पत्त्यांचा समूह. दोन प्रकारचे सीक्वेन्स बनवले जातात – प्युअर सीक्वेन्स आणि इम्प्युअर (अशुद्ध) सीक्वेन्स. रमीचा डाव जिंकण्यासाठी तुमच्या रमीच्या हातामध्ये कमीत कमी एक प्युअर सीक्वेन्स असणे गरजेचे आहे.
प्युअर (शुद्ध) सीक्वेन्स
प्युअर सीक्वेन्स म्हणजे एकाच सूटमधील तीन किंवा अधिक सलग पत्त्यांचा समूह. रमी ह्या पत्त्यांच्या खेळात प्युअर सीक्वेन्स बनवण्यासाठी खेळाडू कुठल्याही जोकर किंवा वाईल्ड कार्डचा वापर करू शकत नाही.
प्युअर सीक्वेन्सची पुढील काही उदाहरणे आहेत.
- 5♥ 6♥ 7♥ (तीन पत्त्यांसह प्युअर सीक्वेन्स आणि त्यात जोकर किंवा वाईल्ड कार्डचा वापर करण्यात आलेला नाही)
- 3♠ 4♠ 5♠ 6♠ (चार पत्त्यांसह प्युअर सीक्वेन्स. त्यात जोकर किंवा वाईल्ड कार्डचा वापर करण्यात आलेला नाही.)
इम्प्युअर (अशुद्ध) सीक्वेन्स
इम्प्युअर सीक्वेन्स म्हणजे एकाच सूटमधील तीन किंवा अधिक पत्त्यांचा समूह आणि त्यासोबत एक किंवा अधिक जोकर कार्डांचा वापर केलेला असतो.
इम्प्युअर सीक्वेन्स कसा बनवतात त्याची पुढे काही उदाहरणे दिली आहेत.
- 6♦ 7♦ Q♠ 9♦ (यात 8♦ च्या जागी Q♠ चा वाईल्ड जोकर म्हणून वापर करून इम्प्युअर सीक्वेन्स बनवण्यात आला आहे.)
- 5♠ Q♥ 7♠ 8♠ PJ (यात 6♠ च्या जागी Q♥ चा वाईल्ड जोकर म्हणून आणि 9♠ च्या जागी प्रिंटेड छापील जोकरचा वापर करण्यात आला आहे.)
सेट कसे बनवायचे?
सेट म्हणजे विभिन्न सूटमधील समान मूल्याचे तीन किंवा अधिक पत्यांचा समूह. सेट बनवताना तुम्ही वाईल्ड कार्ड किंवा जोकरचा वापर करू शकता.
सेटची उदाहरणे
- A♥ A♣ A♦ (ह्या सेटमध्ये तीनही एक्के वेगवेगळ्या सूटमधील असून हा एक वैध सेट आहे.)
- 8♦ 8♣ 8♠ 8♥ (हा रमी सेट वेगवेगळ्या सूटमधील चार अठ्ठ्यांनी बनलेला आहे.)
- 9♦ Q♠ 9♠ 9♥ (यात सेट बनवण्यासाठी 9♣ च्या जागी Q♠ ह्या वाईल्ड कार्डचा वापर करण्यात आला आहे.)
- 5♦ 5♣ 5♠ PJ (यात सेट बनवण्यासाठी 5♥ च्या जागी प्रिंटेड जोकरचा वापर करण्यात आला आहे.)
- 5♦ 5♣ Q♠ PJ (यात सेट बनवण्यासाठी 5♠ च्या जागी Q♠ ह्या वाईल्ड कार्डचा आणि 5♥ च्या जागी प्रिंटेड जोकरचा वापर करण्यात आला आहे.)
- 5♦ 5♣ PJ Q♥ Q♠ (हा 5♠ 5♥ च्या जागी प्रिंटेड जोकर आणि Q♥ ह्या वाईल्ड कार्डसोबत आणखी एक वाईल्ड जोकर Q♠ लावून १३ पत्त्यांचे समूह नीट लावण्यासाठी ५ पत्त्यांचा सेट बनवण्यात आला आहे.)
विशिष्ट उदाहरण: 2♥ 3♥ 4♥ 5♥| 5♣ 6♣ 7♣ 8♣ | 5♦ 5♣ PJ Q♥ Q♠ (१३ पत्त्यांचा डाव नीट लावून घोषित करण्यासाठी ५ पत्त्यांचा सेट लावण्यात आला आहे)
नोंद: सेट हा विभिन्न सूटच्या समान कार्डांनी बनवण्यात येतो. यात तुम्ही एकाच सूटमधील दोन किंवा अधिक कार्डे वापरू शकत नाही. ते अवैध आहे. तसेच, सेटमध्ये चारपेक्षा अधिक पत्ते असू शकतात. त्यामुळे तुमचा चार पत्त्यांचा सेट असेल आणि त्यात तुम्ही आणखी एक जोकर वापरत असाल तर तो एकूण ५ पत्त्यांचा सेट बनेल आणि तरीही तो वैध असेल. कुठल्याही क्षणी हातामध्ये १३ हून अधिक पत्ते असले नाही पाहिजेत.
अवैध सेटची उदाहरणे
- Q♥ Q♥ Q♦ (यात ह्या एकाच सूटमधील दोन राण्या असल्यामुळे हा सेट अवैध आहे.)
- 7♠ 7♥ 7♦ 7♠ Q♥ (यात दोन इस्पिक सत्त्या आहेत. पाचवा पत्ता म्हणून वाईल्ड कार्ड Q♥ चा वापर वैध असला तरी दोन इस्पिक सत्त्यांमुळे हा सेट अवैध आहे.)
रमी हा पत्त्यांचा खेळ कसा खेळायचा?
सुरूवातीपासून शेवटपर्यंत खेळ कसा खेळायचा हे जाणून घेण्यासाठी रमीचे हे सोपे नियम आणि सूचना पाळा:
- रमीचा पत्त्यांचा खेळ हा २ ते ६ खेळाडूंमध्ये पत्त्यांचा दोन गठ्ठ्यांसोबत खेळला जातो. प्रत्येक खेळाडूला १३ पत्ते वाटले जातात आणि कुठलाही एखादा पत्ता त्या डावातील वाईल्ड जोकर किंवा जोकर कार्ड म्हणून निवडला जातो.
- आपल्या हातातील १३ कार्डांमधून वैध सेट्स आणि सीक्वेन्सेस बनवण्यासाठी खेळाडूंनी उपलब्ध असलेल्या बंद किंवा खुल्या गठ्ठ्यांमधून एक पत्ता उचलून आपल्याला नको असलेला पत्ता टाकून द्यायचा असतो. आपल्याकडे आलेल्या वाईल्ड जोकर किंवा प्रिंटेड जोकरचा वापर करून खेळाडू इम्प्युअर सीक्वेन्स किंवा सेट बनवू शकतात.
- भारतीय रमी नियमांनुसार, एकदा का खेळाडूने १ प्युअर सीक्वेन्स आणि अधिक समूह सीक्वेन्सेस किंवा सेट्स सह २ वैध सीक्वेन्सेसमध्ये हातातील १३ पत्ते नीट लावले की तो खेळाडू आपला डाव लागल्याचे घोषित करून तो डाव जिंकू शकतो.
रमी हा पत्त्यांचा खेळ जिंकण्यासाठी टिपा
ज्याप्रमाणे रमीचे नियम माहिती असणे गरजेचे आहे, त्याचप्रमाणे काळजीने आणि आपले लक्ष एकाग्र करून खेळणेही महत्त्वाचे आहे. रमीचा डाव जिंकण्यासाठी आणि तुमच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा एक पाऊल पुढे राहण्यासाठी ह्या काही टिपा आहेत.
- डावाच्या सुरूवातीलाच प्युअर सीक्वेन्स बनवा. प्युअर सीक्वेन्सशिवाय खेळाडू डाव लागल्याचे घोषित करू शकत नाही.
- एक्का, गुलाम, राणी आणि राजा यांसारखे जास्त गुण असलेले पत्ते टाकून द्या. त्याजागी जोकर किंवा वाईल्ड कार्ड्सचा वापर करा. त्यामुळे जर तुम्ही डाव हरलात तर तुमच्यावरील गुणांचा भार कमी होईल.
- शक्य तेवढे खाली टाकलेल्या पत्त्यांमधून कमीत कमी पत्ते उचला. ते खुले असल्यामुळे तुम्ही काय पत्ते लावत आहात याचा अंदाज प्रतिस्पर्ध्यांना येऊ शकतो.
- स्मार्ट पत्त्यांच्या शोधात रहा. उदा. कुठल्याही सूटचा ७ हा त्याच सूटमधील ५ आणि ६ तसेच ८ आणि ९ सोबतही चालू शकेल.
- जोकर्स रमीमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. उच्च मूल्याच्या पत्त्यांच्या जागी त्यांचा वापर करण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, जोकर आणि वाईल्ड कार्ड्सचा वापर प्युअर सीक्वेन्स बनवण्यासाठी केला जाऊ शकत नाही.
- जेव्हा तुम्ही डाव लागल्याचे घोषित करायला तयार असाल, तर तुमचे पत्ते पुन्हा पुन्हा तपासून पहा आणि मगच बटण दाबा. अवैध घोषणेमुळे तुम्ही जिंकत असलेला डावही पूर्णपणे हरू शकता.
रमी नियमांमध्ये वापरण्यात येणारे सामान्य शब्द
भारतीय रमीमध्ये पुढील काही शब्द सामान्यपणे वापरले जातात. खेळणे सुरू करण्याआधी प्रत्येक खेळाडूला ते माहिती असायला हवेत.
रमी टेबल म्हणजे काय?
जिथे रमीचा खेळ खेळला जातो त्याला रमी टेबल म्हणतात। प्रत्येक रमी टेबलवर प्रत्येक डावासाठी २ ते ६ खेळाडू बसू शकतात.
जोकर आणि वाईल्ड कार्ड्स म्हणजे काय?
रमी खेळताना पत्त्यांच्या संचामध्ये एक प्रिंटेड जोकर असतो आणि खेळाच्या सुरूवातीला असाच कुठलाही निवडलेला एक पत्ता असतो ज्याला वाईल्ड कार्ड म्हणतात. ह्या दोन्ही पत्त्यांची भूमिका एकच असते. जोकर्सचा वापर सेट्स आणि इम्प्युअर सीक्वेन्सेस बनवण्यासाठी केला जातो. समूह बनवताना जोकर हव्या असलेल्या पत्त्याच्या जागी लावता येऊ शकतो. रमीच्या खेळात हे वैध आहे.
ड्रॉ आणि डिस्कार्ड काय आहे?
सर्व रमीच्या खेळांमध्ये, प्रत्येक खेळाडूला १३ पत्ते वाटले जातात. त्याव्यतिरिक्त, पत्त्यांचे दोन गठ्ठे असतात, ज्यातून खेळाडू पत्ता उचलू शकतात, त्याला कार्ड किंवा पत्ता ड्रॉ करणे असे म्हणतात. एकदा का खेळाडूने पत्ता ड्रॉ केला की त्याला आपल्या हातातील एक पत्ता टाकावा लागतो, ज्याला डिस्कार्डिंग असे म्हणतात.
सॉर्टिंग ऑफ कार्ड्स म्हणजे काय?
कार्ड्सचे सॉर्टिंग डाव सुरू होण्याच्या सुरूवातीलाच केले जाते म्हणजेच सुरूवातीलाच पत्ते योग्यप्रकारे लावले जातात. त्यामुळे तुम्हांला सेट्स आणि सीक्वेन्सेस लावायला मदत होते आणि पत्ते एकमेकांमध्ये मिसळण्याची शक्यता कमी होते. पत्ते उघड झाले की तुम्ही केवळ सॉर्ट बटण दाबून खेळायला सुरूवात करू शकता.
ड्रॉप म्हणजे काय?
जेव्हा खेळाडू रमी डावाच्या सुरूवातीला किंवा मध्येच खेळ सोडायचे ठरवतो तेव्हा त्याला ड्रॉप असे म्हणतात। ड्रॉप होणे म्हणजे स्वतःच्या मनाने खेळातून बाहेर पडणे. पहिला ड्रॉप = २० गुण, खेळाच्या मध्ये ड्रॉप = ४० गुण आणि शेवटी ड्रॉप तसेच जास्तीत जास्त ८० गुणांचे नुकसान होऊ शकते.
पूल रमीच्या बाबतीत जर खेळाडून १०१ पूलमधून बाहेर पडला तर स्कोअर २० असतो. २०१ पूल रमीमधून बाहेर पडला तर ड्रॉप स्कोअर २५ असतो. ज्या गेममध्ये बेस्ट ऑफ २ किंवा बेस्ट ऑफ ३ खेळले जाते त्यात ड्रॉप करायला परवानगी नाही.
कॅश टुर्नामेंट्स म्हणजे काय?
कॅश टुर्नामेंट्स म्हणजे ज्या टुर्नामेंट्स खऱ्या कॅशसाठी खेळल्या जातात आणि ज्यामध्ये खरी कॅश बक्षिसे भारतीय रूपयांमध्ये दिली जातात. ह्या टुर्नामेंट्स २४x७ आणि नॉक–आऊट पद्धतीने खेळल्या जातात. कुठलेही कॅश गेम्स खेळण्यासाठी खेळाडूने आपल्या रमीसर्कल खात्यामध्ये कॅश भरायला हवी.
मी टुर्नामेंटमध्ये कसा सामिल होऊ?
सगळ्या वरच्या नॅव्हिगेशन पॅनलमध्यप ‘टुर्नामेंट्स’मध्ये जा. आता तुम्हांला खेळायची असलेली टुर्नामेंट निवडा. संबंधित टुर्नामेंट यादीमध्ये तुम्हांला सामिल व्हायची इच्छा असलेल्या कुठल्याही ओपन टुर्नामेंट्सवर क्लिक करा. अखेरीस, टुर्नामेंट डिटेल्सच्या खाली चमकणाऱ्या ‘जॉईन धिस टुर्नामेंट’ बटणावर क्लिक करा.
इनव्हॅलिड डिक्लेरेशन म्हणजे काय?
रमी ह्या पत्त्यांच्या खेळामध्ये जेव्हा वैध सीक्वेन्सेस किंवा सेट्सशिवाय खेळाडू डिक्लेरेशनचे बटण दाबतो तेव्हा ते इनव्हॅलिड डिक्लेरेशन (अवैध घोषणा) असते. त्यामुळे खेळाडू तो डाव हरेल आणि प्रतिस्पर्ध्याला आपोआप विजेता म्हणून घोषित करण्यात येईल.
रमी खेळताना सामान्यतः खेळाडू करत असलेल्या इनव्हॅलिड डिक्लेरेशन्सची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत:
-
अवैध सेट्ससोबत चुकीचे डिक्लेरेशन
उदाहरण १: 10♠ 10♠ 10♦ 10♣ Q♥
एका सेटमध्ये ३ किंवा अधिक पत्ते असू शकतात, मात्र सेट बनवताना समान मूल्याचे आणि विभिन्न सूट्सचे पत्ते वापरले जातात. अशा परिस्थितीत, यात वाईल्ड जोकर बदाम राणीची भर टाकण्यात आली आणि तो पाचवा पत्ता बनला, जे नियमांनुसार बरोबर आहे पण ह्या समूहामध्ये एकाच सूटमधील दोन पत्ते असल्यामुळे हे चुकीचे डिक्लेरेशन ठरते.
उदाहरण २: K♥ K♥ K♦
ह्या सेटमध्ये ३ पत्ते आहेत, जे सेटमध्ये कमीत कमी किती पत्ते असायला हवेत त्या नियमाला अनुसरून आहेत. तसेच, ह्या सेटमध्ये समान मूल्य असलेले पत्तेच आहेत पण ते विभिन्न सूटमधील असायला हवेत. सेटमध्ये एकाच सूटमधील एकापेक्षा अधिक पत्ता असता कामा नये. ह्या उदाहरणामध्ये सेटमध्ये दोन पत्ते एकाच सूटमधील असून त्यामुळे हे चुकीचे डिक्लेरेशन ठरते.
-
अवैध सीक्वेन्सेससह चुकीचे डिक्लेरेशन
उदाहरण १: 10♠ 10♥ 10♦ 10♣ | 5♠ 5♥ 5♦ | 6♠ 6♥ 6♣ | 9♥ 9♦ जोकर
वैध डिक्लेरेशनसाठी २ सीक्वेन्सेसची गरज असते, ज्यापैकी एक प्युअर सीक्वेन्स असावा लागतो, म्हणजेच जोकरशिवाय बनवण्यात आलेला सीक्वेन्स आणि दुसरा प्युअर किंवा इम्प्युअर सी क्वेन्स जोकरसहित किंवा जोकरशिवाय सीक्वेन्स असला तरी चालतो. मात्र, इथे दिलेल्या उदाहरणामध्ये सीक्वेन्सच नाहीये आणि त्यामुळे हे चुकीचे डिक्लेरेशन ठरते.
उदाहरण २: K♥ K♠ K♦ | 6♥ 7♥ जोकर | 9♠ 10♠ J♠ जोकर | 5♠ 5♥ 5♦
वैध डिक्लेरेशनमध्ये २ सीक्वेन्सेस असायला हवेत, त्यापैकी एक प्युअर सीक्वेन्स म्हणजेच जोकरशिवाय बनवलेला सीक्वेन्स आणि दुसरा प्युअर किंवा इम्प्युअर सीक्वेन्स जोकरसहित किंवा जोकरशिवाय सीक्वेन्स असला तरी चालतो. ह्या उदाहरणामध्ये २ सीक्वेन्सेस आहेत पण दोन्ही इम्प्युअर सीक्वेन्स म्हणजेच जोकरसह बनवलेले सीक्वेन्सेस आहेत आणि प्युअर सीक्वेन्स नाहीच आहे. डिक्लेरेशन करण्याआधी प्युअर सीक्वेन्स असणे बंधनकारक आहे.
उदाहरण ३: Q♥ Q♠ Q♦ | 6♥ 7♥ 8♥ 9♥ | 5♠ 5♥ 5♦ | 10♠ 10♥ 10♦
रमी ह्या पत्त्यांच्या खेळामध्ये सीक्वेन्सेस अतिशय महत्त्वाचे असतात आणि डाव जिंकण्यासाठी तुमच्याकडे निदान २ सीक्वेन्सेस असणे गरजेचे आहे, ज्यापैकी एक प्युअर सीक्वेन्स आणि दुसरा प्युअर किंवा इम्प्युअर असला तरी चालतो. ह्या उदाहरणामध्ये प्युअर सीक्वेन्स आहे मात्र दुसरा सीक्वेन्स नाहीये आणि त्यामुळे हे चुकीचे डिक्लेरेशन ठरते.
उपयोगी तक्ता - खेळावे कसे आणि वैध रमी डिक्लेरेशनसाठी रमीबद्दल मार्गदर्शन:
१३ पत्त्यांची रमी लागली असल्याची घोषणा करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवा:
प्युअर सीक्वेन्स |
इम्प्युअर सीक्वेन्स |
सेट १ आणि सेट २ |
---|---|---|
करायलाच हवा असा | करायलाच पाहिजे असे काही नाही (कमीत कमी २ सीक्वेस बनवण्याच्या अटीची पूर्तता करण्यासाठी बनवू शकता) |
करायलाच पाहिजे असे काही नाही (कमीत कमी पूर्ण १३ पत्त्यांचे वैध ग्रुपिंगही केले जाऊ शकते) |
३ किंवा अधिक पत्त्यांपासून बनलेला | ३ किंवा अधिक पत्त्यांपासून बनलेला | जोकरशिवाय ३ किंवा ४ पत्त्यांचा बनलेला किंवा जोकरसह ३, ४ किंवा अधिक पत्त्यांचा बनलेला |
एकाच सूटमधील पत्ते सलग क्रमानुसार लावले जातात | एकाच सूटमधील पत्ते वाईल्ड कार्ड जोकर किंवा प्रिंटेड जोकरसोबत सलग क्रमानुसार लावले जातात | समान मूल्याचे आणि विभिन्न सूटमधील पत्ते (२ समान रंगांचे पण वेगवेगळ्या सूटमधील पत्ते वापरले जाऊ शकतात. उदा. 5♠ 5♥ 5♦). |
यात जोकर किंवा वाईल्ड कार्डचा वापर केला जाऊ शकत नाही | यात जोकर किंवा वाईल्ड कार्डचा वापर केला जाऊ शकतो | जोकर किंवा वाईल्ड कार्डचा वापर केला जाऊ शकतो |
वर दिलेल्या नियमांनुसार रमीमध्ये १३ पत्ते लागले असल्याची घोषणा करण्यासाठी शक्य कॉम्बिनेशन्सः:
- यात ४ पत्त्यांचा एक प्युअर सीक्वेन्स आहे
- यात ३ पत्त्यांचा एक इम्प्युअर सीक्वेन्स आहे ज्यात 8♣ हा वाईल्ड जोकर आहे
- यात ३ पत्त्यांचा एक 'सेट १' आहे
- यात ३ पत्त्यांचा एक ''सेट २’ असून त्यात 'प्रिंटेड' जोकरचा वापर करण्यात आला आहे
१३ पत्त्यांच्या गेम नियमांसाठी ही फाईल डाऊनलोड करा: “आत्ताच PDF डाऊनलोड करा"
भारतीय रमी नियमांनुसार गुणांची आकडेमोड कशाप्रकारे केली जाते?
जेव्हा तुम्ही ऑनलाईन रमीचा पत्त्यांचा खेळ खेळत असता, तेव्हा गुणांची आकडेमोड कशाप्रकारे केली जाते ते पाहूया.
पत्ते | मूल्य |
अधिक मूल्य असलेले पत्ते - एक्का, राजा, राणी, गुलाम | ह्या सर्व पत्त्यांना प्रत्येकी १० गुण असतात |
जोकर आणि वाईल्ड कार्ड्स | शून्य गुण |
इतर पत्ते | ह्या पत्त्यांवरील आकड्यांनुसार त्यांना गुण असतात |
उदाहरण: 8 ♥, 9 ♥ 10 ♥ | 8 points, 9 points, 10 points |
हरणाऱ्या खेळाडूचे गुण
जर खेळाडूकडे प्युअर सीक्वेन्ससह २ सीक्वेन्सेस नसतील | तर सर्व पत्त्यांच्या गुणांची बेरीज केली जाते. जास्तीत जास्त गुण ८० धरले जातात |
जर खेळाडून प्युअर सीक्वेन्ससह एकूण २ सीक्वेन्स बनवले असतील | तर जे पत्ते सीक्वेन्समध्ये नसतील त्यांच्या गुणांची बेरीज केली जाईल |
चुकीची घोषणा | ८० गुण |
पहिला ड्रॉप | २० गुण |
खेळाच्या मधील ड्रॉप | ४० गुण |
सलग ३ वेळा चुकणे | ४० गुणांच्या नुकसानासह खेळाच्या मधील ड्रॉप समजला जाईल |
टेबल सोडणे | जर खेळाडू बंद गठ्ठ्यातील पत्ता उचलून मग टेबल सोडत असेल तर त्याला खेळामधील ड्रॉप समजला जाईल. जर खेळाडूने कुठलाही पत्ता उचलला नसेल तर टेबल सोडण्याला पहिला ड्रॉप समजले जाईल. |
जिंकलेल्या रक्कमेसोबत गुणांची आकडेमोड करण्याबद्दलची उदाहरणे
उदाहरण: ६ खेळाडूंचे टेबल (वाईल्ड जोकर Q♦)
खेळाडू | बनलेला हात | गुणांची आकडेमोड |
खेळाडू १ | 2♥ 3♥ 4♥ | 5♣ 6♣ Q♦ | 8♦ 8♠ 5♣ | 2♦ 2♣ | K♠ Q♠ | खेळाडूकडे २ सीक्वेन्स आहेत - १ प्युअर आणि १ इम्प्युअर. त्यामुळे केवळ न लागलेल्या पत्त्यांचे गुण धरण्यात येतील = ४५ |
खेळाडू २ | 4♠ 4♥ 4♣| 4♦ 5♦ Q♦ | 3♠ 7♠ 8♠ | Q♦ K♦ | 10♣ 9♣ | ह्या खेळाडूने २ सीक्वेन्स लावले नाहीयेत. त्याचा प्युअर सीक्वेन्सही लागला नाहीये. त्यामुळे सर्व पत्त्यांचे गुण धरण्यात येतील = ६८ |
खेळाडू ३ | 3♥ 4♥ 5♥ | 5♣ 6♣ 7♣ Q♦ | 8♦ 5♣ | 2♦ 2♣ 2♥ | K♠ | ह्या खेळाडूकडे २ सीक्वेन्स आहेत - १ प्युअर आणि १ इम्प्युअर. ह्याचा एक सेटही लागला आहे. त्यामुळे केवळ ग्रुपमध्ये नसलेल्या कार्डांचे गुण धरण्यात येतील = २३ |
खेळाडू ४ | A♥ 4♥ 5♥ | 5♣ 6♣ 10♣ J♦ | 8♦ 5♣ | 2♦ 2♣ Q♥ | K♠ | २० गुणांच्या नुकसानासह सर्वप्रथम खेळ सोडला |
खेळाडू ५ | 4♠ 4♥ 4♣| 4♦ 5♦ Q♦ | A♠ 7♠ 8♠ | Q♦ K♦ | J♣ 9♣ | सलग ३ वेळा चुकला = ४० गुण |
खेळाडू ६ | 2♥ 3♥ 4♥ | 5♣ 6♣ 7♣ Q♦ | 5♦ 5♣ 5♥ | 2♦ 2♣ 2♥ | विजेता |
रमी कॅश गेम्समध्ये तुमच्या विनिंग्सची (जिंकलेली रक्कम) आकडेमोड कशी केली जाते?
शेवटी महत्त्वाचे काय आहे तर जिंकलेली रक्कम तुमच्या खात्यामध्ये पाहणे. तुमच्या डॅशबोर्डवर दिसत असलेली रक्कम कशी ठरते तेसुद्धा तुम्हांला माहिती असणे गरजेचे आहे. खऱ्या पैशांसाठी ऑनलाईन रमी खेळण्यासाठी ही आकडेमोड कशी करतात हे जाणून घेऊया.
-
पॉईंट्स रमीमधील विनिंग्सची आकडेमोड?
जेव्हा तुम्ही पॉईंट्स रमी कॅश गेम्स खेळत असता, तेव्हा ते आधीच ठरवलेल्या रूपयांमधील मूल्यावर आधारित असते. त्या डावाचा विजेता डावाच्या शेवटी बाकी खेळाडूंनी हरलेली पूर्ण रक्कम जिंकतो. त्याची आकडेमोड पुढीलप्रकारे केली जाते.
जिंकलेली रक्कम = (सर्व प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या गुणांची बेरीज) X (गुणाचे ठरवण्यात आलेले रूपयांमधील मूल्य) - रमीसर्कल शुल्क
हे अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी पुढील उदाहरण पाहूया:
उदाहरण:
रू. ८६० च्या टेबलवर पैशांसाठी एकूण ६ खेळाडू पॉईंट्स रमी खेळत आहेत. प्रत्येक गुणासाठी रू. ४ एवढे मूल्य आधीच निश्चित करण्यात आले आहे. यापैकी १ खेळाडू विजेता बनेल तर बाकीचे ५ हरतील. हरणाऱ्या खेळाडूंचे गुण अनुक्रमे ४५, ७८, २३, २०, ४० असतील, तर जिंकलेल्या रक्कमेची आकडेमोड पुढीलप्रमाणे करण्यात येईल:
४x (४५+७८+२३+२०+४०) = रू. ८२४
रमीसर्कलचे शुल्क वगळून उर्वरित रक्कम खेळाडूंच्या खात्यात जमा केली जाईल.
-
पूल रमीमधील जिंकलेल्या रक्कमेची आकडेमोड?
पूल्स रमीमधील जिंकलेल्या रक्कमेची आकडेमोड पुढीलप्रमाणे करण्यात येईल:
जिंकलेली रक्कम = (प्रवेश शुल्क) X (खेळाडू संख्या) - रमीसर्कल शुल्कउदाहरण:
खेळाडू टुर्नामेंटसाठी ठराविक प्रवेश शुल्क भरतात, ज्याचा वापर प्राईज पूल बक्षिसाची एकूण रक्कम बनवण्यासाठी केला जातो. जर ५ खेळाडू रू. ५० एवढे प्रवेश शुल्क भरून पूल रमीमध्ये सामिल होत असतील तर त्या गेमसाठी प्राईज पूल रू. २५० चा होईल
विजेता रू. ५० x ५ = रू. २५० जिंकेल
रमीसर्कलचे शुल्क वगळून उर्वरित रक्कम खेळाडूंच्या खात्यात जमा केली जाईल.
-
डील्स रमीमधील जिंकलेल्या रक्कमेची आकडेमोड?
डील्स रमीमध्ये प्रत्येक डीलच्या अखेरीस विजेता सगळ्या चिप्स जिंकतो. ह्या विनिंग्सची आकडेमोड पुढीलप्रमाणे असेल:
विनिंग्स = प्रत्येक चिप म्हणजेच एक गुण असे समजून सर्व प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या गुणांची बेरीज.
उदाहरण:
असे मानूया की टेबलवर ६ खेळाडू आहेत आणि खेळाडू क्र. ५ रमीचा हात लागला असे घोषित करतो. बाकीचे पाच खेळाडू अनुक्रमे १०, २०, ३०, ३५ आणि ४० गुणांसह हरतात. त्यामुळे विजेत्याच्या चिप्स १० + २० + ३० + ३५ + ४० = १३५ होतील.
वर दिलेल्या मागदर्शनानुसार योग्य पद्धतीने आणि कॅश जिंकण्यासाठी रमी खेळायला सुरूवात करा. रमीसर्कल तुम्हांला ऑनलाईन रमीचा सहजसोपा, विनासायास अनुभव प्रदान करण्यासाठी रमी गेम डाऊनलोड करण्याचा पर्याय देतो.
आमच्या सपोर्ट टीमशी संपर्क साधा
रमीसर्कलची सपोर्ट टीम तुम्हांला बेस्ट रमी एक्सपिरीअन्सTM अनुभव प्रदान करण्यासाठी २४x७ उपलब्ध असते. तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीसह info@webtopiaservicestech.com वर आमच्या कस्टमर सपोर्ट टीमशी संपर्क साधा आणि तुमच्या समस्या सांगा. आमचे प्रतिनिधी समाधानासह तुमच्याशी लवकरच संपर्क साधतील.
Disclaimer: This game may be habit-forming or financially risky. Play responsibly.